Physics, Chemistry आणि Mathematics — JEE Main Paper 1 च्या pattern वर MCQ आणि Numerical चा सराव, JEE Advanced पद्धतीचे सराव पेपर, आणि प्रत्येक Test नंतर सविस्तर विश्लेषण.
पूर्ण अभ्यासक्रमाची Mock Test 75 प्रश्न, 300 गुण आणि 180 मिनिटांची असते — बरोबर उत्तराला +4 आणि चुकीच्याला -1. Numerical प्रश्नांना पर्याय नसतात; विद्यार्थी उत्तर टाइप करतो. विभागनिहाय वेळेचं बंधन नाही, त्यामुळे विद्यार्थी विषयांमध्ये मोकळेपणाने फिरू शकतात. तीच Test 20 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सोडवल्यावर निकालात Percentile आणि एकूण Rank दिसू लागतात. प्रश्न आणि प्रश्नपत्रिका English मध्येच असतात.
54 प्रश्न, 180 गुण, 180 मिनिटं — अलीकडच्या JEE Advanced Paper 1 च्या आकाराचा. JEE package मध्येच येतो, वेगळे पैसे नाहीत. JEE Advanced चा pattern दरवर्षी बदलतो, म्हणून हा Paper 1 पद्धतीचा सराव आहे, अधिकृत pattern नाही; "एकापेक्षा जास्त बरोबर पर्याय" आणि "जोड्या जुळवा" हे प्रश्नप्रकार अजून नाहीत.
In a metre bridge (wire length 1 m), the left gap contains a combination of Y and Y/2, and the right gap a combination of X and X/2, such that the resistance of the left gap to that of the right gap is in the ratio 2 : 1. If the galvanometer shows zero current, what is the balancing length l₁ measured from the left end?
प्रकरण: Current Electricity · काठिण्य: मध्यम