Sharp Test Series

कॉलेज, क्लास आणि वैयक्तिक विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण online practice-test platform — स्वतःची प्रश्नबँक चढवण्यापासून ते Percentile आणि Rank असलेल्या निकालापर्यंत.

हे कसं चालतं

  • प्रश्नबँक — विषय, प्रकरण, इयत्ता, काठिण्य आणि स्पष्टीकरणासह स्वतःचे प्रश्न Excel मधून चढवा, किंवा आमची तपासलेली बँक वापरा.
  • विद्यार्थी — विद्यार्थ्यांची यादी Excel मधून चढवा; प्रत्येकाचं login आपोआप तयार होतं.
  • Test तयार करा — प्रकरणनिहाय, पूर्ण अभ्यासक्रम, किंवा परीक्षेच्या pattern वर — तिथे गुण आणि negative marking आपोआप भरलं जातं.
  • विद्यार्थी Test ऑनलाइन सोडवतात — फोनवर किंवा संगणकावर. timer उलटा चालतो, आणि बाजूच्या पट्टीत प्रत्येक प्रश्न सोडवलेला, न सोडवलेला किंवा पुन्हा बघायचा असा दिसतो. submit करताच निकाल उघडतो.
  • निकालाचं विश्लेषण — पूर्ण Test चं आणि प्रत्येक विषयाचं Percentile, एकूण Rank, आणि प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. तीच Test 20 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सोडवल्यावर Percentile व Rank दिसू लागतात.

सूचना: login नंतरचं platform, प्रश्न आणि छापील पेपर पूर्णपणे English मध्ये आहेत.

छापील प्रश्नपत्रिका — कॉलेज आणि क्लाससाठी

  • MCQ पेपर — आत्ता उपलब्ध: MHT-CET, JEE Main + Advanced, NEET किंवा BITSAT च्या pattern वरचे पूर्ण पेपर, किंवा प्रकरणनिहाय पेपर. प्रत्येक पेपरसोबत OMR sheet आणि Answer Key PDF मध्ये, तुमच्या कॉलेजचं नाव व logo घेऊन. भरलेले OMR scan करा किंवा फोटो काढून चढवा — गुण आपोआप मोजले जातात.
  • लेखी (Theory) पेपर — HSC बोर्ड pattern: Chapter Test, Unit Test आणि Term End — Section A, B, C, D सह, आदर्श उत्तरं आणि गुणदानासह. पेपर आमच्या तपासलेल्या बँकेत तयार असलेल्या प्रकरणांमधून बनतात, आणि दर आठवड्याला नवी प्रकरणं जोडली जातात. 11वीची Annual आणि 12वीची Prelim पूर्ण अभ्यासक्रमाच्या असतात, त्यामुळे त्या विषयाची सगळी प्रकरणं तयार होताच तो विषय उघडतो. नमुना पेपर खाली आहेत.

निकालात काय दिसतं

नमुना निकाल · JEE Main Practice Test
68/ 100 गुण
92.41Percentile
12Rank / 145
Physics22 / 34
Chemistry25 / 33
Mathematics21 / 33
प्रति प्रश्न सरासरी वेळ42s
चुकलेल्या प्रश्नांवर सरासरी वेळ1m 18s

कोणती प्रकरणं सर्वात जास्त वेळ खातात ते दिसतं — तोच वेळ विद्यार्थी पुढच्या Test मध्ये वाचवू शकतो.

चुकलेल्या उत्तराचं विश्लेषण

A body of mass 2 kg moving at 3 m/s collides head-on with a body of mass 1 kg moving at 4 m/s in the opposite direction. If the collision is perfectly inelastic, their common velocity is —

B. 3.33 m/sतुमचं उत्तर
C. 0.67 m/s✓ बरोबर उत्तर
नेहमीची चूक विरुद्ध दिशेचा वेग −4 ऐवजी +4 धरला जातो, त्यातून 10/3 = 3.33 m/s येतं — म्हणजे नेमका पर्याय B.
उपाय काहीही लिहायच्या आधी एक दिशा धन ठरवा, आणि दुसऱ्या दिशेच्या प्रत्येक वेगापुढे उणे चिन्ह द्या.
पायऱ्या p = 2(3) + 1(−4) = 2 kg·m/s → पूर्णतः अस्थितिस्थापक, म्हणून दोन्ही एकत्रच जातात → 2 = (2+1)v → v = 0.67 m/s

प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासोबत नेहमीची चूक — विद्यार्थी नेमके कुठे घसरतात ते — आणि उपाय / पायऱ्या, म्हणजे बरोबर पद्धत. विद्यार्थ्याला फक्त बरोबर उत्तर नाही, तर उत्तर का चुकलं तेही दिसतं.

Sharp AI Assistant● सुरू आहे
💬 WhatsApp